खरकटवाडीत घरफोडी; ६६ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:32 AM2021-08-29T04:32:35+5:302021-08-29T04:32:35+5:30
घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा दागिन्यांसह रोकड असा ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. तालुक्यातील ...
घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा दागिन्यांसह रोकड असा ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. तालुक्यातील खरकटवाडी येथे २६ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
कृष्णा सावळाराम तांदळे हे बाहेरगावी गेल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी कपाट व डब्यातील सोन्या, चांदीचे दागिने, तसेच काही रोकड असा ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. आष्टी ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
...
जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर
माजलगाव : जुन्या भांडणातून दोन गट समाेरासमोर आले. याप्रकरणी ग्रामीण ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून ग्रामीण ठाण्यात आठजणांवर गुन्हे नोंद झाले.
तालुक्यातील निपाणी टाकळी फाटा येथे २७ ऑगस्ट रोजी संजय बाबूराव पवार (वय २८, रा. लोणगाव) यास फायटरने मारहाण करण्यात आली. गोर सेनेला व समाजाला सहकार्य कार करत नाही, या कारणावरून त्यास मारहाण केली. रवींद्र किसन आडे, संपत रामसिंग चव्हाण, निखिल संपत चव्हाण (तिघे रा. हनुमाननगर तांडा) व अशोक संपत राठोड (रा. मंजरथ रोड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. दुसऱ्या गटातर्फे संपत रामसिंग चव्हाण यांनी तक्रार दिली. जुन्या भांडणाची कुरापत काढून काठीने व लाथाबुक्क्याने २७ ऑगस्ट रोजी मारहाण करण्यात आली. जायकोबा राठोड (रा. केसापुरी), अरुण सुखदेव पवार (रा. राजेवाडी), नागूराव शेकू राठोड (रा. मोगरा), संजय बाबूराव पवार (रा. लोणगाव) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.
...
दारूच्या नशेत पिता-पुत्रास दगडाने मारहाण
धारुर : तालुक्यातील काळुचीवाडी येथे दारूच्या तर्रर्र नशेत पिता-पुत्रास दगडाने मारहाण केल्याची घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. छत्रभुज यादव घुले (वय ५१) व त्यांच्या मुलास विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गावातीलच गणेश नागनाथ बिक्कड, कृष्णा नागनाथ बिक्कड यांच्यावर धारुर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
...
जागेच्या कारणावरून मारहाण, ९ जणांवर गुन्हा
केज : जागा तुझी नाही, तू बांधकाम करू नको असे म्हणत जगन्नाथ मुरलीधर जाधव (वय ३८) यांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केल्याची घटना शिंदी येथे २६ ऑगस्ट रोजी घडली. त्यांच्या सहकाऱ्यांनाही मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. गावातीलच परमेश्वर जाधव, रामेश्वर जाधव, गणपत जाधव, भागवत जाधव, मोहन जाधव, संगीता जाधव, अलका जाधव, समिंदरा जाधव यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.