अंबेसावळीत घराला बाहेरून कड्या लावून केली चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:20+5:302021-09-15T04:39:20+5:30

बीड : तालुक्यातील पिंपळनेरपासून काही अंतरावर असलेल्या अंबेसावळी येथील सुभाष चंदू मुसळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरामधून ...

The burglary took place in Ambesavali by locking the house from outside | अंबेसावळीत घराला बाहेरून कड्या लावून केली चोरी

अंबेसावळीत घराला बाहेरून कड्या लावून केली चोरी

googlenewsNext

बीड : तालुक्यातील पिंपळनेरपासून काही अंतरावर असलेल्या अंबेसावळी येथील सुभाष चंदू मुसळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून घरामधून दहा ग्रॅम सोन्यासह नगदी दहा हजार रुपयांची रोकड पळवून नेल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारस घडली. यावेळी चोरट्यांनी गावातील अन्य घरांच्या बाहेरून कड्या लावल्या. काही वेळानंतर गावकरी जागे झाल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी धाव घेतली होती.

मागील काही दिवसांत पिंपळनेर हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी रात्री येथील सुभाष चंदू मुसळे हे आपल्या घरामध्ये झोपले असता मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावामध्ये प्रवेश केला. मुसळे यांच्या निवासस्थान परिसरातील सर्व घरांच्या कड्या बाहेरून लावल्या. त्यानंतर चोरट्यांनी मुसळे यांच्या घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये चोरी करून आतील एक पेटी, बाहेर आणली. या कालावधीत गावातील काहीजण जागे असून, ते आपल्या दिशेने येत असल्याचा संशय आल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. चोरी केलेली पेटी ही गावालगतच्या एका शेतात आढळून आली आहे. चोरट्यांनी यावेळी मुसळे यांच्या घरातून दहा ग्रॅम सोन्यासह नगदी दहा हजार रुपये चोरून नेले. या घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानदेव सानप, जमादार एस. एन. राठोड, डापकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. घटनेची पाहणी करून पंचनामा करण्यात आला, असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राठोड हे करत आहेत.

Web Title: The burglary took place in Ambesavali by locking the house from outside

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.