अर्धा एकर ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:41 AM2018-09-21T00:41:01+5:302018-09-21T00:43:27+5:30

तालुक्यातील निमगांव चोभा येथे गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान महावितरणच्या ११ के.व्हि. विद्युत वाहिनीची तार तुटली. घर्षणाने स्पार्किंग होऊन तार तुटुन परिसरातील ऊसाच्या पिकावर पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत हिराबाई भास्कर गि-हे यांच्या सर्व्हे नं.२३६ मधील एक एकर व कस्तुरबाई नवनाथ गि-हे यांचा एक एकर आणि आजिनाथ रामभाऊ झगडे यांचा अर्धा एकर ऊस संपुर्ण जळाला आहे.

Burn half acre of sugarcane | अर्धा एकर ऊस जळाला

अर्धा एकर ऊस जळाला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील निमगांव चोभा येथे गुरुवारी सकाळी १० ते ११ वाजेच्या दरम्यान महावितरणच्या ११ के.व्हि. विद्युत वाहिनीची तार तुटली. घर्षणाने स्पार्किंग होऊन तार तुटुन परिसरातील ऊसाच्या पिकावर पडली. त्यामुळे लागलेल्या आगीत हिराबाई भास्कर गि-हे यांच्या सर्व्हे नं.२३६ मधील एक एकर व कस्तुरबाई नवनाथ गि-हे यांचा एक एकर आणि आजिनाथ रामभाऊ झगडे यांचा अर्धा एकर ऊस संपुर्ण जळाला आहे.
ऊसामधुन धूर निघू लागल्याचे जवळच शेतात काम करणाऱ्या भाऊसाहेब झगडे, अंकुश थेटे यांना दिसले. त्यांनी सरपंच मधुकर गिºहे व इतर तरुणांना फोन करून बोलावले. तरुणांनी उभ्या उसामध्ये जाऊन लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेजारी असलेल्या उसापर्यंत आग पोहचली नाही.
१९७२ सालापासूनच्या जुनाट व जीर्ण तारा तारा बदलण्याबाबत १६ मे २०१८ रोजी महावितरणच्या आष्टी येथील अभियंता कार्यालयात शेतकरी आजिनाथ झगडे यांनी अर्ज दिला होता. मात्र, याचा अधिकाºयांनी कसलाही विचार केला नाही. त्यामुळे ही तार पुन्हा तुटल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Burn half acre of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.