बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 02:03 PM2021-08-24T14:03:11+5:302021-08-24T14:10:54+5:30

Shiv Sena Vs Narayan Rane : आज सकाळपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केली.

Burning of symbolic statue of Narayan Rane in Beed | बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

बीड जिल्ह्यात शिवसैनिक आक्रमक; नारायण राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची धिंड काढून दहन

Next

बीड : केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thakarey ) यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. जिल्ह्यात बीड शहर, परळी, धारूर आदी ठिकाणी शिवसैनिकांनी वक्तव्याचा निषेध करत राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढून दहन केले. तर काही ठिकाणी पुतळा आणि फोटोंवर चप्पल-बूट मारत जोडेमारो आंदोलन करण्यात आले.  ( Burning of symbolic statue of Narayan Rane in Beed)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय अवजड मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी आक्षेपार्ह वक्तव्य करत टीका केली. यानंतर राणे यांच्या वक्तव्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. आज सकाळपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन केली. परळीत आंदोलकांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढली.बीड शहरात पुतळ्याचे दहन केले. तर धारूर येथे पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

हेही वाचा - कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

परळीत राणेंच्या प्रतीकात्मक फोटोंचे दहन 
येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात शिवसेनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले  .यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभयकुमार ठक्कर, तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे , शहर प्रमुख राजेश विभुते व भोजराज पालीवाल, नारायण सातपुते  सचिन स्वामी व इतर शिवसैनिक उपस्थित होते नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या यावेळी कार्यकर्त्यांनी हातात कोंबडी घेऊन व नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक फोटोचे दहन करण्यात आले.

धारुरमध्ये नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन
धारुर तालुका शिवसेनेच्यावतीने नारायण राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करुन निषेध करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद,मा.तालुका प्रमुख विनायक ढगे,तालुका संघटक राजकुमार शेटे,उपतालुका प्रमुख बंडु बाप्पा सावंत,तालुका सचिव बाबा सराफ,उपशहर प्रमुख नितीन भैया सद्दीवाल, सुनिल भांबरे,गणेश पवार,विशाल सराफ,सुनिल सुरवसे,आलीम सय्यदसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

बीड शहरात नगर रोड व कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन 
बीड शहरात शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केले. नगर रोड आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांच्या राणे यांच्या निषेधार्थ दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी राणेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये नारायण राणेंच्या विरोधात शिवसैनिकांचे जोडेमारो आंदोलन

Web Title: Burning of symbolic statue of Narayan Rane in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.