भरधाव दुचाकीची बसला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 04:17 PM2019-08-21T16:17:11+5:302019-08-21T16:20:42+5:30

दुचाकीवरील दोघे लग्नानिमित्त जात होते

Bus - bike accident at Patoda; One died, one was seriously injured | भरधाव दुचाकीची बसला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

भरधाव दुचाकीची बसला धडक; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देउपचारादरम्यान झाला एकाचा मृत्यू

कडा (बीड ) : आळंदी-पुणे-कंधार या बसला नगर रोडवरील बाळेवाडी फाट्यावर भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले होते. यातील एकाच उपचारादरम्यान बुधवारी मृत्यु झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. अपघाताची घटना मंगळवारी (दि.२० ) दुपारी घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील तागडखेल येथील रावसाहेब शिरसाठ आणि भिमराव चव्हाण हे दोघेजण मंगळवारी दुपारी एका विवाह सोहळ्यासाठी दुचाकीवरून (एम. एच. 46, O, 325 ) प्रवास करत होते. भरधाव वेगात जात असताना नगर रोडवरील बाळेवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीने समोरून येणाऱ्या 'आळंदी-पुणे-कंधार' बसला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रावसाहेब दशरथ शिरसाठ (55)  यांचा मृत्यू झाला. तर भिमराव चव्हाण हे देखील मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंभोरा पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Bus - bike accident at Patoda; One died, one was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.