बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:28 AM2018-11-02T00:28:25+5:302018-11-02T00:29:06+5:30

बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचे बोनट अचानक उघडल्याने कार थांबली. तितक्यात पाठीमागून आलेल्या बसची कारला जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली व बसही कलंडली. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले.

Bus-car accidents; 12 passengers injured | बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी

बस-कार अपघात; १२ प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देगेवराईलगत प्रकार : कारचे बोनेट उघडल्याने दुर्घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : बीडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचे बोनट अचानक उघडल्याने कार थांबली. तितक्यात पाठीमागून आलेल्या बसची कारला जोरात धडक बसल्याने कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली व बसही कलंडली. सुदैवाने बसमधील प्रवासी बालंबाल बचावले. बसचालक गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई बायपासवर गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली. बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार झाले.
बीडहून औरंगाबादकडे जाणाºया कारचे (एमएच२३ जे/ १००१) बायपासवर अचानक बोनट उघडले गेले. त्यामुळे कार अचानक थांबली. पाठीमागून येणाºया बीड-औरंगाबाद बसची (एमएच २०/बीएन २३६६) जोरदार धडक बसल्याने कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली तर बसही रस्त्यावर कलंडली.
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला. बसचालक सचिन बहीर (रा.बीड) हे गंभीर जखमी असून त्यांना बीडला हलविले. दरम्यान कारमध्ये असलेले प्रकाश ढाकणे (रा. उक्कडपिंपरी ह. मु. बीड) यांनाही किरकोळ मार लागला आहे.
कार कडेला तर बस कलंडली
बसमधील आकाश जाधव (नाळवंडी), शुभम डोरले (ढेकणमोह), भागाबाई किर्दात (बेलखंडी पाटोदा), वनाबाई राऊत व लक्ष्मण राऊत (रा. गुदेंवडगाव), अलका शिंदे (रा. उकंडा), मुक्ताबाई जोगदंड (खळसगाव), विजया मिसाळ (सोनी सावरगाव), शालिनी देशपांडे व बालासाहेब देशपांडे (बीड), लक्ष्मी शेंडगे (रा. धसपिंपळगाव) व उज्ज्वला दातेकर (औरंगाबाद) हे किरकोळ जखमी झाले.

Web Title: Bus-car accidents; 12 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.