नांदुरघाटमध्ये बस येते, पण कुठेही वळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:41+5:302021-02-10T04:34:41+5:30
केज तालुक्याची उपबाजार पेठ असणाऱ्या नांदुरघाट गावामध्ये बस येते, परंतु स्थानक नसल्यामुळे वेगवेगळ्या चौकामधून बस वळविल्या जातात. त्यामुळे गावातील ...
केज तालुक्याची उपबाजार पेठ असणाऱ्या नांदुरघाट गावामध्ये बस येते, परंतु स्थानक नसल्यामुळे वेगवेगळ्या चौकामधून बस वळविल्या जातात. त्यामुळे गावातील किंवा आसपासच्या परिसरांमधून येणाऱ्या जाणाऱ्या वयोवृद्ध , दिव्यांग, अन्य प्रवासी, तसेच विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. प्रवाशांच्या अडचणी सांगताच जागा नसल्यामुळे बस कोठे आणायची व कोठे वळवायची, असा प्रश्न बस चालक करीत आहेत. गावातील बाजार तळावर भरपूर जागा आहे. खासगी वाहने मोठ्या संख्येने उभी असतात. त्यांना जागा करून त्या ठिकाणी गावात येणारी प्रत्येक बस एकाच थांब्यावर उभी करावी, असे आदेश ग्रामपंचायतीने द्यावेत. उपाययोजना करून प्रवाशांची हेळसांड थांबवावी, नसता प्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्कलचे अध्यक्ष विशाल नाळपे, उपाध्यक्ष दत्ता आंधळकर आदींनी दिला आहे.