जिल्ह्यात विजेवर धावणाऱ्या बसेसला लागणार वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:41+5:302021-09-02T05:12:41+5:30
बीड : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांना मागणी वाढते आहे. एसटी महामंडळाने ही ...
बीड : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे सीएनजी, एलपीजी आणि इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांना मागणी वाढते आहे. एसटी महामंडळाने ही विजेवर चालणाऱ्या बसेस संदर्भात प्रत्येक जिल्ह्याकडून माहिती मागविली आहे. बीड जिल्ह्यातून ५८ बसेसच्या मार्गाबाबत माहिती मागविल्याचे समजते. मात्र ही प्रक्रिया अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. विजेवर चालणाऱ्या बसेसच्या संदर्भाने विविध आगाराकडून माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे समजते.
चार्जिंग सुविधेच्या मार्गावर धावणार बसेस
चार्जिंग स्टेशन तसेच एलएनजी स्टेशन औरंगाबाद येथील बस वाहतूक सेवेचा भार पाहता होतील. त्यामुळे सुरूवातीस बीड ते औरंगाबाद मार्गावरच या बसेस धावण्याची शक्यता आहेत. तर इतर पर्याय व सुविधा जशा उपलब्ध होतील, त्यानुसार पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे.
आणखी सहा महिने लागणार
विजेवर चालणाऱ्या बसेससाठी नियोजन सुरू असले तरी या बसेसच्या पूरक व्यवस्थेसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी जागेची उपलब्धता आदी बाबी निश्चित झाल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू होईल, त्यामुळे किमान सहा महिने ते एक वर्ष या सुविधेला लागण्याची शक्यता आहे.
३) कोठे होणार चार्जिंग स्टेशन (बॉक्स)
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद व पुणे तसेच सोलापूर येथे चार्जिंग स्टेशन होण्याची शक्यता आहे. मात्र बीडपासून या शहरांचे अंतर पाहता चार्जिंग स्टेशन किमान शंभर किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. तरच विजेवर धावणाऱ्या बसेसचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो.
४) खर्चात होणार बचत
सध्या एसटी महामंडळाला साधारण ९० रूपये लिटर प्रमाणे डिझेल खरेदी करावे लागते. विजेवर चालणाऱ्या बसेस सुरू झाल्यास या खर्चात ४० ते ५० रूपयांची बचत होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे.
५) विभाग नियंत्रकाचा कोट
टाळेबंदी नंतर बीड विभागाला २२ ऑगस्ट रोजी ४५६ नियते मधून ५४ लाख ६२ हजार रूपयांचे उत्पन्न झाले आहे. रापमकडून बीड विभागाला ५८ इलेक्ट्रिक बसेस देण्याचे ठरले आहे. यासाठी ५८ रूट निश्चित करण्याबाबत सूचना आहेत. रापमच्या धोरणानुसार कार्यवाही होईल.
- अजयकुमार मोरे, विभाग नियंत्रक, रापम बीड.