प्लॉटविक्रीचा व्यवसाय जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:10+5:302021-09-25T04:36:10+5:30
------------------------------ स्टॅम्पची बेभाव दराने विक्री अंबाजोगाई: विविध शासकीय कामांसाठी लागणाऱ्या स्टॅम्पची बेभाव दराने विक्री करण्यात येत आहे. शंभर रुपयांचा ...
------------------------------
स्टॅम्पची बेभाव दराने विक्री
अंबाजोगाई: विविध शासकीय कामांसाठी लागणाऱ्या स्टॅम्पची बेभाव दराने विक्री करण्यात येत आहे. शंभर रुपयांचा स्टॅम्प १३० रुपयांपर्यंत विक्री केला जात आहे. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीची मोठी लूट होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
-------------------------
नवीन वस्त्यांमध्ये वीजखांब नाही
अंबाजोगाई : येथील नवीन वस्त्यांमध्ये पथदिव्यांची आवश्यकता आहे. मात्र अद्यापही वीजखांब लावण्यात न आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला, मात्र अद्यापही खांब लावले नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
------
रोजगारविषयक मार्गदर्शनाची गरज
अंबाजोगाई : कोरोनाने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. शासनाकडून कुठलीही भरती प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे शासनाने पुढाकार घेऊन रोजगारविषयक मार्गदर्शन शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.
--------------------------
कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची मागणी
अंबाजोगाई: तालुक्यातील बेंबाळ येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची एकच शाखा असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरावेत, अशी मागणी आहे.