माजलगाव आगाराने केल्या बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:52 PM2020-03-19T23:52:51+5:302020-03-19T23:53:54+5:30

माजलगाव : कोरोनाचा फटका व्यापारपेठेसह येथील आगाराला बसत असून पुरेसे प्रवाश्यांअभावी येथील आगाराने कोल्हापूरसह ग्रामीण भागातील अनेक फे-या रद्द ...

Busloads canceled by Majalgaon Depot | माजलगाव आगाराने केल्या बसफेऱ्या रद्द

माजलगाव आगाराने केल्या बसफेऱ्या रद्द

Next
ठळक मुद्देरोज अडीच लाखांची उत्पन्नात घट : जाणारे घटले, येणारे प्रवासी वाढले

माजलगाव : कोरोनाचा फटका व्यापारपेठेसह येथील आगाराला बसत असून पुरेसे प्रवाश्यांअभावी येथील आगाराने कोल्हापूरसह ग्रामीण भागातील अनेक फे-या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आगाराला मागील चार दिवसांपासून रोज अडीच ते तीन लाख रूपयांचा फटका बसत आहे.
मागील चार पाच दिवसापासून सकाळी जाणाºया लांब पल्ल्याची माजलगाव- कोल्हापुरसह अंबेजोगाई, वाघोरा, माळेवाडी, आनंदगाव, राजेवाडी, पाथरी, मुंगी यासह अनेक गाड्या बंद केल्या आहेत. प्रवासी संख्या रोडावल्याने आगाराला दररोज अडीच ते तीन लाखाचा फटका बसत आहे. तर बीड व परभणी येथून येजा करत असलेल्या प्रवाशांची संख्या पाहता तेथील फे-या आगाराने वाढवल्या आहेत. त्यामुळे तोटा काही प्रमाणात भरुन निघत आहे.
लांब पल्ल्यांच्या बसमधून जाणारांची संख्या अतिशय कमी असून येणारांची संख्या जास्त असल्याने आम्हाला त्या फेºया बंद करता येणार नसून ग्रामिण भागातील काही फे-या बंद कराव्या लागतील.यामुळे आगाराला मोठा फटका सहन करावा लागत असल्याचे आगारप्रमुख डी. बी. काळम पाटील म्हणाले.

Web Title: Busloads canceled by Majalgaon Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.