बुट्टेनाथ दरीत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:28 AM2019-07-14T00:28:35+5:302019-07-14T00:29:03+5:30

सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

In the Butenath valley, an illegal liquor barrier was launched | बुट्टेनाथ दरीत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

बुट्टेनाथ दरीत अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड

Next
ठळक मुद्देराज्य उत्पादन शुल्क विभागाची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई

अंबाजोगाई : सलग दुस-या दिवशी अंबाजोगाई लगतच्या अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी बुट्टेनाथ दरी येथे अवैधरित्या मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच शनिवार (दि. १३ जुलै) रोजी सकाळी सात ते साडेअकराच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहिती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.
बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यापैकी काही जागेवरच नष्ट केला. तसेच अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागांतर्गत वडवणी,केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू निर्मिती, विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई होत आहे.
याच कारवाई अंतर्गत सलग दुसºया दिवशी बुट्टेनाथ दरी येथे अवैध मद्यनिर्मिती केंद्रावर धाड टाकून महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत बेवारस ५ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सदर ठिकाणी आरोपी मिळून आले नाहीत. टाकलेल्या धाडीत बेवारस स्थितीत ११ हजार ५३५ लिटर रसायन, ४५ लिटर तयार हातभट्टी दारु, ५७ बॅरल (२०० लिटर), ७० किलो ग्रॅम गूळ, ९ डबे, २ टोपली असा एकूण २ लाख ५९ हजार ६५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला.

Web Title: In the Butenath valley, an illegal liquor barrier was launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.