माजलगावात झाली २० हजार क्विंटल तुर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:30 PM2018-05-16T16:30:32+5:302018-05-16T16:30:32+5:30
बाजार समिती अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशीअखेर २ हजार १४० शेतकऱ्यांनी १९ हजार ९७७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.
माजलगाव (बीड ) : बाजार समिती अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय तुर खरेदी केंद्रावर शेवटच्या दिवशीअखेर २ हजार १४० शेतकऱ्यांनी १९ हजार ९७७ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ऑनलाईन खरेदी प्रक्रियेचे अनेक शेतकऱ्यांना मेसेज न आल्याने ते माञ या खरेदीपासून वंचित राहिले आहेत.
शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा व बोगस शेतकऱ्यांना आळा बसावा म्हणून शासनाने नाफेडच्यावतीने ऑनलाईन पद्धतीने तुर उत्पादकाची नोंदणी केली. प्रत्येक शेतकऱ्यांना मेसेज पाठवून त्यांच्या तुरीची खरेदी येथील बाजार समितीमध्ये करण्यात आली. किचकट प्रक्रिया आणि अनेक वेळा जागेचा अभाव यामुळे केवळ २६ दिवसच हे खरेदी केंद्र चालू राहीले.
या कालावधीत २ हजार १४० शेतकऱ्यांची ५४५० रुपये या हमी भावाने १९ हजार ९७७ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली. यापैकी ६४८ शेतकऱ्यांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती तुर खरेदी केंद्र प्रमुख एम. ए. मुले यांनी दिली
उर्वरित शेतकऱ्याचे पैसे लवकर मिळतील
बाजार समितीच्या शासकीय खरेदी केंद्रावर 2 हजार140 शेतकऱ्यांची तुर खरेदी केली असून 648 शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग करण्यात आले असून उर्वरीत शेतकर्यांचे पैसेही लवकरच वर्ग करण्यात येतील.
- अशोक डक, सभापतीबाजार समिती
सर्व्हर बंद असल्याने अडचण
तुर खरेदीचे अनेक शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन न झाल्याने व तीन दिवस सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतकरी शासकीय खरेदी पासून वंचित राहीले असून तुर खरेदीच्या मुदत वाढीसाठी शासनाकडे प्रयत्न केले जात आहेत.
- एच.एन.सवने, सचिव,बाजार समिती