कॅब, एनआरसी धोरणाविरुद्ध अंबाजोगाई शहरात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 01:08 AM2019-12-18T01:08:01+5:302019-12-18T01:09:07+5:30
भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : भारतीय संविधान मानणा-या नागरीकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी व असंवैधानिक धोरणांविरूध्द तसेच महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी मंगळवारी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील बाराभाई गल्ली येथून निघालेला मोर्चा पाटील चौक, सावरकर चौक, बस स्थानक, शिवाजी चौक मार्गाने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मोर्चात अंबाजोगाईतील भारतीय संविधान मानणा-या संघटना सहभागी झाल्या होत्या.
भारतीय संविधानातील धर्मिनरपेक्ष तत्वाच्या धार्मिक आधारावर दिले जाणारे नागरिकत्वाच्या (कॅब) विरु द्ध तसेच आगामी काळात भारतात काळा कायदा (एनआरसी) धोरणांविरूद्ध व महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास ५ टक्के आरक्षण मिळावे. केंद्रातील भाजप सरकारने नुकतेच संसदेमध्ये पारित केलेल्या नागरीकता संशोधन विधेयकातील मसुदा भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्षतेविरुद्ध असून भारताच्या एकता व अखंडतेच्या विरूद्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील मुस्लिम समाजास सच्चर आयोग,महेमूद रहेमान समिती व कुंडू आयोगाच्या शिफारशी आणि उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणीही करण्यात आली.