केज निवडणूक बेईमानी विरुद्ध इमानदारीची -धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:27 AM2019-10-18T00:27:41+5:302019-10-18T00:28:07+5:30
१९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
विडा : १९९९ पर्यंत मुंडे साहेबांना अंबाजोगाई, परळीच्या चौका - चौकात जे शिव्या देत होते, त्यांना आमच्या तार्इंनी प्रवेश देऊन प्रेम दाखविले. हे कसले प्रेम असा प्रश्न उपस्थित करून बेईमानीला मातीत गाडायची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
केज तालुक्यातील विडा येथे गुरु वारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर पृथ्वीराज साठे, राकाँचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, सुरेश पाटील, नंदकुमार मोराळे, सुमंत धस, दत्तात्रय ठोंबरे, चंद्रकांत खरात उपस्थित होते. धनंजय मुंडे म्हणाले, पृथ्वीराज साठे हे तुमचे काम करतील, तुमच्यासाठी झिजतील, त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याचे ते म्हणाले.
परळीच्या बाजारापेठेला
गतवैभव मिळवून देऊ
परळीच्या बाजारपेठेला गत वैभव प्राप्त करून देणे हे माझे ध्येय आहे. व्यापाऱ्यांना काडीचाही त्रास होणार नाही, त्यांच्या केसालाही धक्का लागला तर माझ्या जिवाला धक्का असे मी समजेल असा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. बुधवारी व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मतदारसंघात सिंचन सुविधा, उद्योग उभारणी झाली तरच बाजारपेठ विकसित होईल. हेच प्रश्न घेवून मी निवडणूक लढवित आहे. या मातीतील माणसासाठी काम करणाºया माझ्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला एक संधी द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.
व्यासपीठावर माजी मंत्री पंडीतराव दौंड, माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, डॉ.प्रदिप वांगीकर, गुलाबराव शेटे, देविदासराव कावरे, कचरूलाल वांगीकर, नागोराव देशमुख, प्रकाशराव टाक, विजयसेठ कुचेरीया, अभय वाकेकर उपस्थित होते