आशांच्या मोर्चाने केज दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:37 AM2021-09-25T04:37:01+5:302021-09-25T04:37:01+5:30
केज : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगार यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतन व भत्ते ...
केज : आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगार यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २४ सप्टेंबर रोजी सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. राष्ट्रीय आरोग्य अभियानात कायम करून शासकीय सेवेत सामावून घ्यावे, ४५ व्या श्रम परिषदेने सुचविलेल्या शिफारशी लागू कराव्यात, आशा व गटप्रवर्तक यांची वेतनावर नियुक्ती करावी, आशा व गटप्रवर्तक थकीत मानधन त्वरित वाटप करावे, शालेय पोषण आहार कामगारांच्या मानधनात वाढ करा, शालेय पोषण आहार कामगारांना कायम नियुक्त करा, सेंट्रल किचन पद्धती बंद करा व घरेलू कामगारांना अन्नसुरक्षेचे राशन कार्ड द्या. या मागण्यांचे निवेदन तहसीलदार दुल्हाजी मेंडके यांना देण्यात आले. सिटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी.जी. खाडे, आशा वर्कर्स युनियनचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी कुरे, तालुकाध्यक्ष उषा खाडे, उपाध्यक्षा अंजना राख, गटप्रवर्तक कविता गव्हाणे, अल्का लामतुरे, आशा स्वयंसेविका अर्चना भालेराव, परवीन शेख, अर्चना साबळे, नीता चव्हाण, जयश्री कोकाटे, वैशाली राख, रत्नमाला पवार, सुनीता शिंदे, राधा कांबळे, संगीता यादव, शकुंतला कराड, ज्ञानेश्वरी कावळे, कल्पना मस्के, प्रमिला तपसे, प्रीती डोंगरे, मीना शेप, सारिका चाटे, ज्योती थोरात, सुषमा कापरे व सलिमा शेख यांच्यासह आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या.
240921\1947-img-20210924-wa0059.jpg
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी तहसीलवर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना दिले.