केजमध्ये शिवसैनिकांचे बोंबा मारो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:17 AM2018-10-13T00:17:38+5:302018-10-13T00:18:11+5:30
महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरिप पिकाची चुकीची व वाढीव आणेवारी देऊन शेतकºयांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोंब मारो आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : महसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खरिप पिकाची चुकीची व वाढीव आणेवारी देऊन शेतकºयांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केज येथील तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात शुक्रवारी सकाळी ११ वाजता बोंब मारो आंदोलन केले.
युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पावसाअभावी खरिपाची पिके हातातून गेली असताना आॅफिसमध्ये बसल्लन चुकीची आणेवारी तयार करून शेतकºयांची फसवणूक करणाºया अधिकाºयांच्या निषेधार्थ बोंब मारो आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी मुख्यमंत्री, महसूलमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करून तहसील परिसर दणाणून सोडला. यावेळी फेर पंचनामे करून व वास्तविक आणेवारी देऊन केज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
आंदोलनात बाळासाहेब पवार, अनिल बडे, अशोक जाधव, बापू गोरे, अभिजीत घाटुळ, प्रकाश केदार, कचरु थोरात, तात्या रोडे, शिवराज देशमुख, भिमा धुमक, प्रभाकर शिंदे, शिवाजी बोबडे, राहुल घोळवे, सुनिल जाधव, राजाभाऊ हांगे, प्रकाश बारगजे, गोरोबा माने, संभाजी गायकवाड, ज्योतिकांत कळसकर, पवन चाटे, संग्राम चाटे, चंद्रकांत इंगळे, राहुल अंधारे, विकी शिंदे, सुधीर जाधव, जनक मोरे, रमेश धिंगाणे, संग्राम भोसले, मच्छिंद्र केदार, धनंजय चाळक, लक्ष्मण आकुसकर, सुरेश धुमक, राजाभाऊ धुमक यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक सहभागी झाले होते.