केजच्या डेडिकेटेड कोविड सेंटरला ऑक्सिजन मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:34 AM2021-04-27T04:34:05+5:302021-04-27T04:34:05+5:30

दीपक नाईकवाडे केज : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केज उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल ...

Cage's dedicated covid center did not receive oxygen | केजच्या डेडिकेटेड कोविड सेंटरला ऑक्सिजन मिळेना

केजच्या डेडिकेटेड कोविड सेंटरला ऑक्सिजन मिळेना

Next

दीपक नाईकवाडे

केज

: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने केज उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) चालू करण्यास शासनाने १४ एप्रिल रोजी परवानगी दिली. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मात्र, दोन आठवड्यांचा अवधी लोटूनही ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने कोरोना झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता येत नसल्याचे दिसून येत आहे.

केज तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने पिसेगाव येथे एक व शारदा इंग्लिश स्कूलमध्ये एक असे दोन कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहेत. या ठिकाणी सामान्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णावर उपचार केले जातात. मात्र, माध्यम लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने उपचारासाठी लोखंडी सावरगाव व अंबाजोगाई येथील डेडिकेटर कोविड हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येते. मात्र, तेथेही कोरोना रुग्णाची संख्या वाढू लागल्याने रुग्णांना जागा उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) चालू करण्यास १४ एप्रिल रोजी परवानगी दिली. उपजिल्हा रुग्णालयात डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटरची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली. मात्र, या ठिकाणी कोविडची सौम्य व मध्यम लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी शंभर जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा अद्यापही करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना स्थलांतरित करावे लागत आहे. सोमवारपासून डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) ऑक्सिजनविना चालू करण्यात आले आहे. या ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता नाही असे पाच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

केज येथील डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी )चालू करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या सगळीकडेच ऑक्सिजनची कमतरता आहे. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी नवीन लोखंडी सिलिंडरची आवश्यकता आहे. केज बीड, परळी व आष्टीसाठी लागणाऱ्या सिलिंडरची ऑर्डर देण्यात आली आहे. - डॉ. संजय राऊत, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय.

===Photopath===

260421\screenshot_2021-04-19-19-37-51-754_commiuivideoplayer_14.jpg

Web Title: Cage's dedicated covid center did not receive oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.