केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दातांच्या आजारावर मिळू लागले उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:41+5:302021-07-17T04:26:41+5:30

केज : येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग चालू करण्यात आला असल्याने या ठिकाणी किडलेले दात व दाढ ...

Cage's sub-district hospital began treating dental ailments | केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दातांच्या आजारावर मिळू लागले उपचार

केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दातांच्या आजारावर मिळू लागले उपचार

Next

केज : येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग चालू करण्यात आला असल्याने या ठिकाणी किडलेले दात व दाढ काढणे, सिमेंट फिलिंग करणे यासह दाताच्या विविध आजारांवर उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली आहे.

केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत शल्य चिकित्सा विभाग सुरू नसल्याने दातांचा आजार असलेल्या रुग्णांना शहरातील खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.

मात्र आता केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दंत चिकित्सक विभाग सुरू करण्यात आला असून डॉ. रमण दळवी हे या विभागात कार्यरत झाले आहेत. या विभागातून मौखिक रोग निदान, मुख कर्करोग निदान, हिरड्यांच्या विविध आजारांवर उपचार, तंबाखू सोडण्यासाठी समुपदेशन, दातांची कीड व लहान मुलांच्या दातांच्या आजारावर उपचार, दाढ व दात काढणे, सिमेंट फिलिंग करणे, स्केलिंग करणे या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी दिली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दाताच्या विविध आजारांवर उपचार करण्यात येत असल्याने गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राऊत यांनी केले आहे.

160721\img-20210709-wa0033.jpg

केज उपजिल्हा रुग्णालयातील दंत शल्य चिकित्सक विभागाची पाहणी करताना उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय राऊत,दंत चिकित्सक डॉ रमन दळवी आदी.

Web Title: Cage's sub-district hospital began treating dental ailments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.