आॅनलाईन पोर्टल रद्द करा; विद्यार्थ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:05 AM2019-08-01T00:05:31+5:302019-08-01T00:06:20+5:30
आॅनलाईन पोर्टल रद्द करून आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
बीड : आॅनलाईन पोर्टल रद्द करून आॅफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. बुधवारी सकाळीच सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रीत येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. विद्यार्र्थ्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.
एका पदाची परीक्षा एकाच दिवशी घेण्यात यावी, एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेण्यात यावी, जिल्हा नियोजन समिती मार्फत फिस ठरवावी, वनरक्षक आणि तलाठी परीक्षेत मोठा घोळ असून सदरील परीक्षा लेखी स्वरूपात परत घेण्यात यावी, मेगा पोलीस भरती लवकरात लवकर घेण्यात यावी यासारख्या मागण्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केल्या. सध्या स्पर्धा परीक्षेची तयार करणाºया विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आजही अनेक विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार आहेत. विशेष म्हणजे हे आंदोलन राजकीय आणि संघटना विरहित केल्याचे सांगण्यात आले. शहरासह जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.