खतांची दरवाढ करायची असेल तर गांजा शेतीची परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:20+5:302021-05-20T04:36:20+5:30

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य ...

Cannabis cultivation should be allowed if fertilizer prices are to be increased | खतांची दरवाढ करायची असेल तर गांजा शेतीची परवानगी द्यावी

खतांची दरवाढ करायची असेल तर गांजा शेतीची परवानगी द्यावी

Next

माजलगाव : केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमती ७० टक्के जवळजवळ वाढ केली असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य झाले असून रासायनिक खतांची दरवाढ तात्काळ मागे घ्यावी. जर केंद्र शासनाला खतांची दरवाढ करायची असेल तर केंद्र शासनाने शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी केली. केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत प्रचंड दरवाढ केली आहे. कोरोनाच्या संकटात सापडलेला शेतकरी हातबल असताना केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटात सापडलेली शेती आणि शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मोदी शासनाने रासायनिक खताची केलेली दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन तहसील कार्यालयात ऑनलाइन पाठविण्यात आले. त्यानंतर ॲड. गोले पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी छतावर सरकारच्या प्रतिकात्मक पुतळयाला फासावर चढवून जोडे मारो आंदोलन केले.

Web Title: Cannabis cultivation should be allowed if fertilizer prices are to be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.