अंबाजोगाईत कोरोनाच्या १२०० चाचण्यांची क्षमता वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:12+5:302021-04-19T04:30:12+5:30

दोन डिजिटल रेडिओग्राफी मिळणार , आरटीपीसीआर युनिट, बायोसेफ्टी कॅबिनेट दाखल अंबाजोगाई : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे ...

The capacity of 1200 corona tests will be increased in Ambajogai | अंबाजोगाईत कोरोनाच्या १२०० चाचण्यांची क्षमता वाढणार

अंबाजोगाईत कोरोनाच्या १२०० चाचण्यांची क्षमता वाढणार

Next

दोन डिजिटल रेडिओग्राफी मिळणार , आरटीपीसीआर युनिट, बायोसेफ्टी कॅबिनेट दाखल

अंबाजोगाई : जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयासाठी मागणी केलेल्या अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स रविवारी रुग्णालय प्रशासनास प्राप्त होणार आहेत. या मशीन्सच्या खरेदीसाठी पालकमंत्र्यांकडून ४२.६० लाख रुपये जिल्हा वार्षिक विकास योजनेतून उपलब्ध करून देण्यात आले होते.

स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी १५ लाख रुपये किमतीची आणखी एक आरटीपीसीआर मशीन व दहा लाख रुपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेट देखील खरेदी करण्यात आले असून, या मशीन्स काल रात्री प्राप्त झाल्या आहेत.

मागील आठवड्यात बीड येथे मुंडेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाराती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबत मागणी केली होती. धनंजय मुंडे यांच्या पुढाकारारून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट स्वाराती येथे शिफ्ट केला असून, याद्वारे जवळपास २९० ते ३०० जम्बो सिलिंडर लिक्विड ऑक्सिजन एका दिवसात निर्माण होईल. त्यामुळे स्वारातीमध्ये आणखी ऑक्सिजन बेड वाढविता येणार असून हा प्लांट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे डॉ. सुक्रे म्हणाले. स्वारातीमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असून, पालकमंत्र्यांच्या मुंडेंच्या निर्देशानुसार १५० बेड वाढविण्यात आले आहेत तसेच आणखी १०० बेड वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

२५६ स्लाईस सिटी स्कॅन मशीनचा प्रस्ताव पाठवला

स्वाराती ग्रामीण रुग्णालयात पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात उपलब्ध असलेली अद्ययावत २५६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन बसवावी, ग्रामीण भागातील रुग्णांना त्यासाठी मोठ्या शहरात जायला लागू नये, यासाठी पालकमंत्री मुंडे यांनी २५६ स्लाईस सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला पाठवला असून, ही मशीन लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुंडे यांनी दिले, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

एक्सरे रिपोर्ट त्वरित मिळणार एक आरटीपीसीआर मशीन वाढल्याने अंबाजोगाई येथे प्रतिदिन आणखी १००० ते १२०० चाचण्या करता येतील. स्वाराती रुग्णालयातील एक्सरे मशीन दहा वर्ष जुनी होती. त्यामुळे एक्सरेबाबत अनेक तक्रारी होत्या. आता अद्ययावत डिजिटल रेडिओग्राफी मशीन्स आज उपलब्ध होत असल्यामुळे रुग्णांचे एक्सरे काही मिनिटात प्राप्त होणार आहेत. व पर्यायाने कोरोनासह अन्य रुग्णांना देखील लवकर उपचार मिळणार आहेत.

Web Title: The capacity of 1200 corona tests will be increased in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.