ताब्यात घेतलेले टिप्पर पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:28+5:302021-02-26T04:47:28+5:30
बीड : अवैधरित्या मुरूम उत्खनन वाहतू करत असताना बीड तहसीलदरांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेले तीन टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात ...
बीड : अवैधरित्या मुरूम उत्खनन वाहतू करत असताना बीड तहसीलदरांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेले तीन टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात उभा केली होते. यापैकी एक टिप्पर चालकाने त्याठिकाणावरून पळवून नेल्याची घटना मंगळवारी घडली, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार शिरीष वमने यांनी अवैधरित्या मुरूम तसेच वाळू वाहतूक उत्खनन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम राबवली आहे. दरम्यान लाखों रुपयांचा महसूल बुडवून उत्खनन करणारे दोन टिप्पर दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. याप्रकरणी क्षीरसागर नामक वाहन मालकावर दंडात्मक कारवाई केली आहे. तर, बुधवारी पाली येथील टिप्पर अवैधरित्या मुरुम वाहतूक करताना बीड येथून ताब्यात घेतले होते. याप्रकरणी चालक खांडेकर याला नोटील देखील दिली होती. दरम्यान सर्व अधिकारी बैठकीला गेल्यानंतर चालकाने जिल्हाधिकारी कार्यालयातून जप्त केलेले टिप्पर पळवून नेले, ते टिप्पर काही कर्मचाऱ्यांना रस्त्यावर दिसल्याचे ही बाब उघकीस आली. याप्रकरणी तलाठी तांदळे यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खांडेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.