खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 07:29 PM2024-05-14T19:29:19+5:302024-05-14T19:29:47+5:30

दिंद्रुडजवळ बीड- परळी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडला असून अपघातांचे कारण बनला आहे.

Car accident on Beed-Parli highway while trying to avoid pothole, four injured | खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात बीड-परळी महामार्गावर कारचा अपघात, चार जखमी

दिंद्रुड (बीड) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड गावाजवळून जाणाऱ्या बीड-परळी महामार्गावरील एक खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात मंगळवारी दुपारी ४ वाजेदरम्यान झाला. कार पुलाचे कठडे तोडत पुलाखाली कोसळली. यात दोन जण गंभीर तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.

दिंद्रुडजवळ बीड- परळी महामार्गावर रस्त्याच्या मधोमध एक खड्डा पडला असून अपघातांचे कारण बनला आहे. जवळपास १२ अपघात गेल्या दोन महिन्यात या खड्ड्यामुळे झाले आहेत. मंगळवारी पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण येथील कल्याण घाडगे, प्रल्हाद भुमरे, शिवाजी वडमारे व अन्य एक जण धारूर तालुक्यातील देव दहिफळ येथे नवस फेडण्यासाठी आले होते. दुपारी  परतत असताना ४ वाजेदरम्यान महामार्गावर अचानक खड्डा समोर आला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार पुलाला धडकून खाली कोसळली. 

यावेळी कारने तीन ते चार पलटी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस स्टेशनचे पोलीस अंमलदार बालाजी सूरेवाड, रेवन दुधाने व वाहन चालक युनूस शेख यांनी अपघातस्थळी धाव घेतली. तसेच सतर्कता दाखवत रुग्णवाहिका येण्यास वेळ लागत असल्याने गंभीर जखमींना पोलीस वाहनातून पात्रुड येथील शासकीय रुग्णालयात हलवले. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा याबाबत माहिती देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे, यामुळे अनेक अपघात होत असल्याचा संताप संगमचे माजी उपसरपंच बळीराम डापकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Car accident on Beed-Parli highway while trying to avoid pothole, four injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.