कारची धडक; दुचाकीस्वार जखमी - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:12+5:302021-07-17T04:26:12+5:30

बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या ...

Car crash; Two-wheeler injured - A | कारची धडक; दुचाकीस्वार जखमी - A

कारची धडक; दुचाकीस्वार जखमी - A

Next

बीड : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण काकासाहेब फाटे हे दुचाकीने पाथर्डी- पाडळशिंगी रस्त्याने जात होते. सावरगाव शिवारात कारने (क्र. एमएच १६ एएम ९७९७) दुचाकीला समोरून धडक दिल्याने लक्ष्मण यांच्या पायाला, डोक्याला, हाताला जखम झाली. उपचारानंतर १४ जुलै रोजी दाखल झालेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

ट्रॅक्टरमध्ये दगड भरण्याच्या कारणावरून मारहाण

बीड : ट्रॅक्टरमध्ये दगड भरण्याच्या कारणावरून लोखंडी गजाने मारहाण करून एकास जखमी केल्याची घटना १३ जुलै रोजी एका लाकडी मिलजवळ घडली. अनंत कोंडीबा पवार यांच्या फिर्यादीनुसार बालू कुराडे, विजय कुराडे, रोहित कुराडे, अजय कुराडे यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेले अनंतच्या वडिलांना मारहाण करत धमकी देण्यात आली. या प्रकरणी परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास हवालदार तोटेवाड करीत आहेत.

Web Title: Car crash; Two-wheeler injured - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.