पुण्यावरून बीडकडे निघालेली कार नदीपात्रात कोसळली, पाच जखमी
By सोमनाथ खताळ | Updated: January 24, 2025 21:17 IST2025-01-24T21:17:17+5:302025-01-24T21:17:45+5:30
बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटना

पुण्यावरून बीडकडे निघालेली कार नदीपात्रात कोसळली, पाच जखमी
- नितीन कांबळे
कडा (जि.बीड) : पुण्यावरून बीडला जात असलेली चारचाकी कार भरधाव वेगात असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून नदीपात्रात पडल्याची घटना शुक्रवारी रात्री आठदरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर कडा येथे घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, जखमींवर कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे येथून बीडला जात असलेली कार (एम.एच १४,एल.ए.५३४१) भरधाव वेगात असल्याने चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून नदीपात्रात पडली. या अपघातात कारमधील शुभम गाडे, महावीर घोडके, चैतन धायबर, अजय चोरमारे, श्रुषी मोहनार (सर्व रा.पुणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर कडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. घटनास्थळी कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी धाव घेत जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.