महाविरतण कार्यालय परिसरात गाजर गवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:20+5:302021-04-20T04:35:20+5:30
बीड : शहरातील माळीवेस भागातील महाविरतण कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या ...
बीड : शहरातील माळीवेस भागातील महाविरतण कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या मार्गी लावावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.
एटीएममध्ये पैसे ठेवण्याची मागणी
बीड : शहरात ठिकठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांनी एटीएम बसविलेले आहेत. बँक अथवा संबंधित एजन्सीच्या वतीने सकाळी एटीएममध्ये पैसे ठेवले जातात. दुपारनंतर अनेक एटीएममधील पैसे संपलेले असतात. अशा वेळी बँक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. एएटीएममध्ये कॅश ठेवण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात भुरटे चोर सक्रिय
पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागात सध्या दुचाकी लंपास होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागात दुचाकीच्या चोरीसह भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यावर खड्डे; दुरुस्तीची मागणी
बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत. अनेकवेळा या रस्त्यावर निघालेल्या खडीवरून जाणारी-येणारी वाहने घसरत असून, अपघातही होऊ लागले आहेत. संबंधितांकडे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागणीचा गांभीर्याने विचार करून, दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.