भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 11:19 AM2023-03-08T11:19:37+5:302023-03-08T11:20:31+5:30

आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल

Case of assault on BJP worker; A case has been registered against MLA Prakash Solanke along with his wife Mangal Prakash Solanke | भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

भाजप कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला प्रकरण; आमदार प्रकाश सोळंकेंसह पत्नीवर गुन्हा दाखल

googlenewsNext

- पुरुषोत्तम करावा 
माजलगाव ( बीड) :
येथील भाजप कार्यकर्ते तथा रमेश आडसकर यांचे विश्वासू अशोक शेजुळ यांच्यावर भरदिवसा सहा हल्लेखोरांनी शहरातील शाहू नगर येथे अडवून रॉडने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा शेजुळ यांच्या फिर्यादीवरून माजलगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, पत्नी मंगल प्रकाश सोळंके, उद्योजक रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सात जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अशोक शेजुळ हे दररोज प्रमाणे मंगळवारी सकाळी १०.३० वाजता शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पान खाण्यासाठी आले होते. त्या ठिकाणाहून घरी परत जात असताना शाहू नगर येथील मोरेश्वर विद्यालय जवळ पाठलाग करत असलेल्या सहा हल्लेखोरांनी अडवले. त्या ठिकाणी अचानक त्यांनी रॉडने अशोक शेजुळ यांच्यावर वार करू लागले, यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी धाव घेतली असता त्यांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला. यावेळी शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक रुग्णालयात पुढील उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले होते. यात शेजुळ हे अत्यंत गंभीर जखमी झाले होते. यात त्यांच्या डाव्या पायाला तीन फ्रॅक्चर, उजव्या पायाला एक फ्रॅक्चर तर दोन्ही हात ही फ्रॅक्चर असून डोक्याला ही जबर मार आहे. 

याप्रकरणी त्यांनी दिलेल्या यादीवरून आ. प्रकाश सोळंके, त्यांची पत्नी मंगल प्रकाश सोळंके, रामेश्वर टवाणी यांच्यासह पाच ते सहा जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करत आहेत.

Web Title: Case of assault on BJP worker; A case has been registered against MLA Prakash Solanke along with his wife Mangal Prakash Solanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.