कास्ट्राईबचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 12:09 AM2018-11-04T00:09:23+5:302018-11-04T00:10:23+5:30
बीड कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी कर्मचा-यांनी हक्काच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केली.
या आंदोलनामध्ये कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष बनकर, गणेश काळे, नागसेन धन्वे, लक्ष्मण राऊत, महेश राजुरकर, रघुनाथ रुचके, दगडू गायकवाड, दिलीप जाधव, मोमीन सिद्दिक, राम बोबडे, रोहिदास मस्के, महेश गाडे, ए.पी सोनवणे, ए.बी.साबळे, आर.बी सोनवणे, ए.व्ही.ससाणे, पी.एस. राऊत, एस.एच.भिसे, डि.एल. गायकवाड, व्ही.एन. तरकसे, सुंदर लोंढे, गोविंद तळेकर, आरविंद राऊत, शेख जावेद, शहाजी कांबळे, मोमीन रियाज, रवींद्र देवगावकर, विजय शिंदे, सुभाष काकड, संजय शिंदे, हानुमान ससाणे, संतोष जैन, राजेंद्र गायकवाड, टि.एन. ठाकुर, एस.बी.टाक, शिवाजी जाधव, विठ्ठल गायकवाडसह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. यानंतर मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.
प्रमुख मागण्या : प्रशासनाला निवेदन सादर
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत चालू करावे. एससी, एसटी, व्हिजे, एसबीसी, ओबीसी सरळसेवा भरती सुरु करून अनुशेष भरावा, २००५ नंतरच्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, विविध विभागातील कंत्राटी पद्धत रद्द करावी.
समान काम समान दाम या तत्वावर शिक्षण सेवक पद रद्द करावे, बिंदुनामावली अद्ययावत न ठेवणाºया कार्यालय व शाळांवर कारवाई करावी, अनुकंपा भरतीचे नियम व अटी रद्द कराव्यात, अनुकंपा भरती करावी आदी मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.