मांजरा धरण ओव्हर फ्लो; दोन दरवाजातून ९.८९६ क्यूसेस विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 04:08 PM2020-11-02T16:08:03+5:302020-11-02T16:08:15+5:30
मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा 224.093 दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठा 176.963 दशलक्ष घनमीटर आहे
- दीपक नाईकवाडे
केज : तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरण बुधवारी ( दि. २८ ) भरले. यानंतर पाण्याची आवक पाहता धरणाच्या दोन दरवाज्यातून सोमवारी सकाळी ८ वाजता मांजरा नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आला. धरणाच्या दरवाजा क्रमांक १ आणि ६ मधून ९.८९६ क्युसेस इतका विसर्ग करण्यात आल्याची माहिती सहाय्यक अभियंता शहाजी पाटील यांनी दिली.
मांजरा धरणातील एकूण पाणीसाठा 224.093 दशलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त पाणीसाठा 176.963 दशलक्ष घनमीटर आहे मांजरा धरणाची एकूण पाणी पातळी 642.37 मीटर आहे. धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणाच्या वरच्या बाजूस असलेले 26 लहान-मोठे तलाव व 14 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले. यानंतर धरणात पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात झाल्याने बुधवारी धरण 100% भरले. यानंतरही धरणात मोठ्याप्रमाणावर आवक होत आहे. यामुळे सोमवारी सकाळी आठ वाजता धरणाच्या दरवाजा क्रमांक एक आणि सहा मधून मांजरा नदी पात्रांमध्ये विसर्ग करण्यात आला. मांजरा धरणाच्या बांधकामास सन 1974 साला सुरुवात करण्यात आली. धरणाचे काम जून 1980 सालात पूर्ण झाले. तेव्हापासून आजपर्यंत धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्याची ही चौदावी वेळ आहे.