सामाजिक उपक्रमांनी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:05+5:302021-09-02T05:13:05+5:30
मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ सप्टेंबर रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सह्याद्री देवराई ...
मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने १ सप्टेंबर रोजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सह्याद्री देवराई येथे वृक्षारोपण, तर बीडमध्ये मोफत आरोग्य निदान शिबिर घेण्यात आले.
१ सप्टेंबर रोजी सकाळी सह्याद्री देवराई येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर रामनगर (ता. बीड) येथील स्नेहसावली अनाथालयास २१ खुर्च्या भेट स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी भजन गायनाचा कार्यक्रम पार पडला. डॉ. अजित जाधव यांच्या दवाखान्यात आरोग्य रोगनिदान शिबिर घेण्यात आले. डॉ. वसंत दाभाडे, डॉ. अजित जाधव, डॉ. सुहासिनी जाधव यांनी तपासणी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, धनंजय शेंडगे, जनार्दन शिंदे, प्रा. पंजाबराव येडे, बबन तांबे, शिवाजी शिंदे, मधुकर शेळके, बापूसाहेब शिंदे, संतोष डोंगरे, श्रीकृष्ण उबाळे, वर्षा माने, शीतल बडगे, मनीषा जगताप, सीमा काकडे, मोहिनी मस्के, शीतल जोगदंड, अश्विनी अंडील , संतोष माने, शिवाजी शिंदे, श्रीमंत सातपुते, नितीन मातकर, दीपक घाटे, ज्ञानदेव काशीद उपस्थित होते.
010921\01bed_27_01092021_14.jpg
वृक्षारोपण