कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:40 AM2021-09-10T04:40:35+5:302021-09-10T04:40:35+5:30
आष्टी : कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळून आगामी सण, उत्सव साजरा करण्याचे आवाहन तहसीलदार ...
आष्टी : कोणतेही विघ्न येणार नाही याची काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळून आगामी सण, उत्सव साजरा करण्याचे आवाहन तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी केले.
गणेशोत्सवासह विविध सणांच्या निमित्ताने आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता कमिटीची बैठक ८ सप्टेंबर रोजी झाली. त्यावेळी ते बोलत होते. उत्सव काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसीलदारांनी केल्या. गणेशोत्सवानिमित्त शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियमानुसार अधिक उंचीची मूर्ती स्थापना करू नये, श्रींचे विसर्जन जागेवरच करावे, विसर्जन मिरवणूक काढू नये, अशा सूचना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आल्या. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, नायब तहसीलदार प्रदीप पांडुळे, सुनील रेडेकर, अक्षय धोंडे, सहायक अभियंता नगरपंचायत दत्तात्रय धसपुते, नगर पंचायत लेखापाल प्रकाश हरकळ, पोलीस कर्मचारी गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे नैतिक जबाबदारीचे भान राखून वाद टाळावे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांनी आभार मानले.