सैनिकांचा सत्कार करून भारतीय सैन्य दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:30 AM2021-01-18T04:30:32+5:302021-01-18T04:30:32+5:30
गेवराई : शहरातील भगवान नगर येथील युवकांनी भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तसेच माजी सैनिकांचा सत्कार करून आदर्श पद्धतीने भारतीय ...
गेवराई : शहरातील भगवान नगर येथील युवकांनी भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या तसेच माजी सैनिकांचा सत्कार करून आदर्श पद्धतीने भारतीय सैन्य दिन साजरा केला.
या वेळी नवनियुक्त सैनिक महेश काळे, ऋषीकेश इथापे, सेवानिवृत्त मेजर रामकृष्ण चेडे, काकडे, जिजा खरात या सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आ. डॉ. नारायण मुंढे, नगरसेवक श्याम येवले, बंडू बारगजे, सतीश दाभाडे हे होते. या वेळी डॉ. नारायण मुंढे यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत कसे घडलो, याचे अनुभवकथन केले. व्यसनांपासून दूर राहून शरीर सुदृढ करण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. सैन्यदलात काम करणारा व्यक्ती सर्वात श्रेष्ठ असल्याचे सांगून नवनियुक्त भरती झालेल्या सैनिकांचे कौतुक केले. प्रास्ताविक डॉ. आबेद जमादार यांनी केले. कार्यक्रमासाठी नागरे, अविनाश खरात, युनुस अन्सारी, शिवाजी नागरे, अनिकेत मुंडे, अक्षय पवार, कृष्णा खरात, वैभव सातपुते, राहुल वनवे, संतोष सुतार, स्वप्निल काकडे, शिरीष मुंडे यांनी परिश्रम घेतले. बंडू बारगजे यांनी आभार मानले.