किल्ल्यातील काटेरी बाभळी जाळून अनोखी होळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:09+5:302021-03-29T04:20:09+5:30
धारुर शहरातील कायाकल्प फाऊंडेशन तथा दुर्गप्रेमींच्या वतीने ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात सातत्याने काटेरी बाभळी, उपद्रवी झाडे व वेली काढण्याचे ...
धारुर शहरातील कायाकल्प फाऊंडेशन तथा दुर्गप्रेमींच्या वतीने ऐतिहासिक महादुर्ग किल्ल्यात सातत्याने काटेरी बाभळी, उपद्रवी झाडे व वेली काढण्याचे काम दर रविवारी सातत्याने चालू आहे. रविवारी किल्ल्याच्या दर्शनी भागात असलेल्या काटेरी बाभळी काढण्यात आल्या. तसेच मागील तीन आठवड्यांपूर्वी काढलेल्या बाभळी चांगल्या पद्धतीने वाळलेल्या असल्याने आज होळीचे औचित्य साधून काटेरी बाभळीच्या फांद्या व कचरा जाळून होळी साजरी करण्यात आली. यावेळी सय्यद शाकेरअली, कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, ज्ञानेश्वर शिंदे, अलंकार कामाजी, विश्वानंद तोष्णीवाल, अक्षय बगाडे, कापसे व जलदूत विजय शिनगारे यांनी आजच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन कचरा व उपद्रवी काटेरी फांद्या जाळून अनोखी होळी साजरी केली.
===Photopath===
280321\img-20210328-wa0136_14.jpg
===Caption===
धारुरच्या किल्ल्यातील काटेरी बाभळी जाळून अनोखी होळी साजरी करण्यात आली.