कोरोनाबाबत जनजागृती करून हनुमान जन्मोत्सव साजरा - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:24 AM2021-04-29T04:24:44+5:302021-04-29T04:24:44+5:30

धारूर शहरात श्रीकाळा हनुमान मंदिर व वसुंधरा मित्रमंडळाच्या वतीने कोरोना जनजागृतीचे फलक शहरात चौकाचौकात लावून व शहरात घरोघरी जनजागृती ...

Celebrating Hanuman Janmotsav by raising awareness about Corona - A | कोरोनाबाबत जनजागृती करून हनुमान जन्मोत्सव साजरा - A

कोरोनाबाबत जनजागृती करून हनुमान जन्मोत्सव साजरा - A

Next

धारूर शहरात श्रीकाळा हनुमान मंदिर व वसुंधरा मित्रमंडळाच्या वतीने कोरोना जनजागृतीचे फलक शहरात चौकाचौकात लावून व शहरात घरोघरी जनजागृती पत्रके वितरित करून वेगळ्या पध्दतीने श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

धारूर येथील श्रीकाळा हनुमान मंदिर जन्मोत्सव समितीच्या व वसुंधरा मित्रमंडळाच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय युवकांनी घेतला. यामध्ये सध्याच्या कठीण परिस्थितीत कोरोनाबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याने कोरोनाविषयी जनजागृती करणारे मोठे फलक शहरात चौकाचौकात लावण्यात आले. त्याचबरोबर एक पत्रक काढून कोरोनाविषयी कुठल्या दक्षता घेतल्या पाहिजेत, याचे पत्रक धारूर शहरातील घराघरात वाटून त्याची जनजागृती करण्यात आली. या युवकांनी इतर सर्व खर्च टाळून असा आगळा वेगळा उपक्रम राबवल्याने या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी या वेळेस हनुमान जन्म उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल तिवारी, वसुंधरा मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहनसिंह हजारी, निमेश जीवन चिद्रवार, जयराज तिवारी, महेश डुबे, प्रतीक तिवारी, कृष्णा जवकर, आकाश तिवारी, संतोष बारस्कर, शुभम काजले, विशाल सिरसाट, सोहम नीलेश डुबे व विशाल तिवारी उपस्थित होते.

===Photopath===

270421\5053img-20210427-wa0113_14.jpg~270421\5053img-20210427-wa0106_14.jpg

Web Title: Celebrating Hanuman Janmotsav by raising awareness about Corona - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.