सिमेंट रस्त्याला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:01+5:302021-05-13T04:34:01+5:30

शिरूर कासार : कालिका देवी विद्यालयापासून जाणारा पांदी रस्ता हा सिमेंट रस्ता झाला होता. मात्र, वर्षाच्या आतच त्याला ...

Cement roadblocks | सिमेंट रस्त्याला तडे

सिमेंट रस्त्याला तडे

googlenewsNext

शिरूर कासार : कालिका देवी विद्यालयापासून जाणारा पांदी रस्ता हा सिमेंट रस्ता झाला होता. मात्र, वर्षाच्या आतच त्याला तडे जाऊ लागले आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी आहे.

पालखी महामार्गाला बसली खीळ

शिरूर कासार : पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग शिरूरमार्गे जात आहे. अत्यंत जवळचा मार्ग म्हणूनही हा ओळखला जात आहे. सिमेंट रस्ता पूर्ण होण्याआधीच या कामाला खीळ बसली आहे. पालखी मार्गाचे हे काम कशामुळे बंद झाले हे स्पष्ट झालेले नाही. हे काम ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

टरबुज, खरबुज शेतीला फटका

शिरूर कासार : कमी अवधीत नगदी पीक म्हणून शेतकरी टरबुज खरबुज लागवड करत असताना कोरोना लाॅकडाऊनचा परिणाम बाजार बंद असल्याने टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. विक्रीअभावी जागेवरच माल वाळून तसेच सडून जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

आता शाळेचा रस्ताच विसरली मुले

शिरूर कासार : गेल्या वर्षभरापासून शाळा बंद राहिल्याने व सतत खंड पडत असल्याने आता शाळेचा रस्ताच विसरल्यागत झाले आहे, ऑनलाईन पद्धतीचे शिक्षण म्हणावे तेवढे प्रभावी दिसून येत नाही.

अशांत जिवाला शांत करते ते संगीत

शिरूर कासार : कोरोना महामारीने भयभीत सर्वच झाले असून माणसांची मने सैरभैर आणि अशांत दिसून येत आहे. अशांत मनाला शांती मिळवण्याची ताकद एकमेव संगीत साधनेत असल्याचे सांगितले जाते. वेगवेगळे राग वेळेनुसार बदलले जात असल्याने त्याचे यथार्थ ज्ञान असणे गरजेचे असल्याचे संगीत जाणकार बोलतात .

Web Title: Cement roadblocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.