कृषी विधेयकांच्या प्रती जाळून केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:32+5:302021-06-06T04:25:32+5:30
माजलगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कृषी कायदे ...
माजलगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळे कृषी कायदे पास केले आहेत. या कृषी कायद्यांच्या अध्यादेशाला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले याच्या निषेधार्थ माजलगाव येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कृषी विधेयकांच्या प्रती जाळून केंद्राच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
शनिवारी या तीन कृषी कायद्यांच्या प्रति जाळून निषेध करण्यात यावा, असे आवाहन किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मजलगाव येथे माकपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. देशातील सर्व शेतकरी संघटनांनी मागील सहा महिन्यांपासून ही कृषी विधेयके केंद्र सरकारने बिनशर्त परत घ्यावे, शेतकऱ्यांना एमएसपीची लेखी हमी द्यावी यासाठी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन पुकारले आहे. यामध्ये देशातील सर्व भागातून लाखो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. चर्चेची दारे बंद करून सरकार हे आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. असे असले तरी सरकार जोपर्यंत शेतकरीविरोधी विधेयके परत घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार किसान मोर्चाने केला आहे.
यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. मुसद्दीक बाबा, ॲड. सय्यद याकूब शेख, कॉ. समीर शादाब खान व कार्यकर्ते उपस्थित होते.
===Photopath===
050621\img-20210605-wa0108_14.jpg
===Caption===
कृषी विधेयकाच्या प्रती जाळून केंद्र सरकारचा निषेध करताना माकपचे पदाधिकारी, कार्यकर्ते.