गेवराईत सीईओ रस्त्यावर..चार दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:27+5:302021-05-20T04:36:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा अधिक आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान, बुधवारी बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गेवराईत कोरोनाचे उल्लंघन करणारांवर कारवाई केली. त्यांनी चार दुकाने सील केले.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी तालुक्यातील मिरकाळा, गढी, अर्धमसला, सिरसदेवी, पाडळसिंगी येथे पाहणीसाठी रस्त्यावर उतरले. नियमांचे उल्लंघन करणारी चार दुकाने सील केली. त्यांच्याकडून २७ हजार ४०० एवढा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी सीईओ कुंभार यांनी गावातील सरपंच, ग्रामसेवक व नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, कृषी अधिकारी अशोक राठोड, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी चव्हाण, कारवाई करण्यात आलेल्या गावातील ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.
===Photopath===
190521\img-20210519-wa0217_14.jpg
===Caption===
गेवराई येथे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी लॉकडाऊनचे नियम मोडणारांविरुध्द रस्त्यावर उतरून कारवाई केली.