सीईओंनी घेतली पाटोद्याच्या अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:11+5:302021-07-14T04:39:11+5:30

अनिल गायकवाड कुसळंब (ता. पाटोदा) : जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचे गाव कुसळंबसह मूगगावदेखील १५ दिवसांसाठी ...

The CEOs took the presence of Patodya officials | सीईओंनी घेतली पाटोद्याच्या अधिकाऱ्यांची हजेरी

सीईओंनी घेतली पाटोद्याच्या अधिकाऱ्यांची हजेरी

Next

अनिल गायकवाड

कुसळंब (ता. पाटोदा) : जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचे गाव कुसळंबसह मूगगावदेखील १५ दिवसांसाठी कंटेन्मेंट घोषित करण्यात आले. मूगगावसह आजूबाजूच्या आठ गावांत कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासन तातडीने जागे झाले आहे. बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार यांनी मंगळवारी तातडीने कुसळंब कोविड सेंटर गाठून अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह तेथील विविध कोरोनाग्रस्तांची प्रत्यक्ष हजेरी घेतली आणि अनुपस्थित असलेल्या रुग्णांच्या संदर्भामध्ये अत्यंत तातडीच्या कडक सूचना देत त्यांना उपस्थित राहण्याचे आदेशित करण्यात आले आहे. निष्काळजीपणाबद्दल पाटोदा तालुका अधिकाऱ्यांसह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी हजेरी घेतली.

पाटोदा तालुक्यातील कुसळंबच्या अंतर्गत असलेल्या मूगगाव येथे दोन दिवसांत ३० पेक्षा अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळल्याने चिंतेचा विषय झाला आहे. पाटोदा तालुक्यात कमी झालेली ही संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, तालुक्याच्या आठेगाव पुटा परिसरामधील कुसळंब येथे कोविड सेंटर आहे. गेल्या आठवड्यात या सेंटरमधील संख्या अत्यल्प झाली होती; परंतु गेल्या दोन दिवसांमध्ये मुगाव आणि इतर गावांमध्ये ही संख्या वाढल्याने या केंद्रातील संख्या आता पन्नासच्या वर गेली आहे.

एकूण स्थिती पाहता ही संख्या अत्यंत चिंतेचा विषय बनली असून ग्रामस्थांना हा धोक्याचा इशारा आहे.

कोविड सेंटरमध्ये काही रुग्ण इथे उपस्थित नसल्याचे आढळून आल्यानंतर सीईओंचा पारा चढला. त्यांनी प्रत्यक्ष स्वतः फोन लावत माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व सुरळीत करण्यासंदर्भात सूचना दिल्या.

एकूण वाढती संख्या लक्षात घेता आज, बुधवारपासून कुसळंब गाव कंटेन्मेंट घोषित करण्यात आले असून १५ दिवस संपूर्ण व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भामध्ये पाहणी करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक व ग्राम समिती यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे.

शासन, आरोग्य प्रशासनाचे नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे यावेळी आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुमार यांच्यासमवेत पाटोदा तहसीलचे तहसीलदार मुंडलोड, पाटोदा तालुका आरोग्याधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, गटविकास अधिकारी प्रभाकर अनंत्रे, विस्ताराधिकारी उत्तरेश्वर जाधव, ग्रामसेवक दीपक वाघमारे, तलाठी जाधव तसेच डॉ. सोनल लड्डे, आदींसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

मूगगाव बनले चिंतेचा विषय

दोन दिवसांत तीसपेक्षा अधिक रुग्ण!

आठेगाव पुट्ट्यातील मूगगाव हे पाटोदा तालुक्यात असले तरी त्यांची जास्तीत जास्त आवक-जावक आणि व्यवहार हे आष्टीशी निगडित असतात. आष्टीमध्ये हे प्रमाण अधिक असल्याने मूगगावमध्ये एक-दोन दिवसांत तब्बल तीसपेक्षा अधिक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.

उपाययोजना सुरू

बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजित कुंभार यांनी आज पाटोदा तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या; विशेषत: कुसळंब येथे दिलेल्या भेटीमध्ये कोविड रुग्णांच्या संदर्भामध्ये सविस्तर भेट देत माहिती घेतली आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांना संपूर्ण सूचना दिल्या. त्यांच्या सूचनांचे पालन करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची खबरदारी घेऊ.

डॉ. लक्ष्मीकांत तांदळे ( तालुका वैद्यकीय अधिकारी, पाटोदा)

130721\img_20210713_124014_526_14.jpg

Web Title: The CEOs took the presence of Patodya officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.