'परिवर्तनाच्या' नावाखाली करोडोंचा अपहार करणारा चेअरमन अलझेंडे न्यायालयाला शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 05:53 PM2021-03-09T17:53:08+5:302021-03-09T18:00:58+5:30

करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणात ३ वर्षांपासून होता फरार

Chairman Alzende, who embezzled crores in the name of 'transformation', surrendered to the court | 'परिवर्तनाच्या' नावाखाली करोडोंचा अपहार करणारा चेअरमन अलझेंडे न्यायालयाला शरण

'परिवर्तनाच्या' नावाखाली करोडोंचा अपहार करणारा चेअरमन अलझेंडे न्यायालयाला शरण

Next

माजलगाव : परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थेतील करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणात फरार असलेला चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे मंगळवारी येथील न्यायालयात शरण आला. तो मागील तीन वर्षांपासून फरार होता. 

येथील परिवर्तन मल्टीस्टेट व सामाजिक परिवर्तन सहकारी पतसंस्थाचा चेअरमन विजय उर्फ  भारत अलझेंडे याने मल्टीस्टेटच्या 13 शाखा सुरु केल्या होत्या. तर एक सहकारी पतसंस्था होती. ही मल्टीस्टेट ज्यादा व्याजदर देत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ठेवी ठेवल्या होत्या. यात मोठा अपहारकरून मागील तीन वर्षांपासून अलझेंडे फरार होता. मंगळवारी दुपारी 4 वाजता येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायालयात तो स्वतः शरण आला. 

अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधिश अरविंद वाघमारे यांनी अलझेंडेची 23 तारखेपर्यंत जिल्हा तुरूंगात रवानगी केली. परिवर्तन मल्टीस्टेटमध्ये करोडो रूपयांचा अपहार झाल्यानंतर अनेक पेन्शनधारक रस्त्यावर आले होते.  अनेकांच्या जमापुंजी बुडाली तर अनेकांच्या मुलीची लग्न मोडली होती. अलझेंडे न्यायालयाला शरण आल्याने ठेवीदारांना ठेवी परत मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Web Title: Chairman Alzende, who embezzled crores in the name of 'transformation', surrendered to the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.