प्रशासनाने दुकानांची वेळ वाढवून दिल्याने बाजारपेठेत चैतन्य - A - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:38 AM2021-08-14T04:38:32+5:302021-08-14T04:38:32+5:30
आष्टी तालुक्यातील दुकानांची वेळ दुपारी साडेबारापर्यंत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत होती. कमी वेळ उपलब्ध असल्याने अनेक व्यावसायिकांची गैरसोय ...
आष्टी तालुक्यातील दुकानांची वेळ दुपारी साडेबारापर्यंत असल्याने ग्राहकांची गर्दी वाढत होती. कमी वेळ उपलब्ध असल्याने अनेक व्यावसायिकांची गैरसोय होत होती. शिवाय जागेचे भाडे आणि वीज बिलासह इतर खर्चही चुकत नव्हता. त्यामुळे कडा आणि आष्टी येथील व्यापाऱ्यांनी आ. सुरेश धस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. आ. धस यांनी तहसीलदार, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडून सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार आता सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ऐन सणासुदीला हा निर्णय घेण्यात आल्याने बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, व्यावसायिक आणि ग्राहकांनी कोविडसंबंधी योग्य ती काळजी घेण्याचे आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन आ. सुरेश धस, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी केले आहे.