महाशिवरात्रीनिमित्त वैद्यनाथ मंदिरात 'हर हर महादेव'चा जयघोष; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 03:42 PM2019-03-04T15:42:09+5:302019-03-04T15:47:34+5:30
सकाळी दहावाजेपर्यंत तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन.
परळी (बीड ) : देशातील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले वैद्यनाथ मंदिर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. भाविकांनी दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच मंदिरात रांगा लावल्या. राज्य व परराज्यातून भाविक रात्री बारा वाजल्यापासून मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. पहाटेपासून भाविकांच्या मंदिरात रांगा लागल्या. सकाळी नऊच्या नंतर गर्दी वाढत गेली.
मंदिर परिसरात अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश गायकवाड, सावंत , शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास शेळके संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व 500 पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असून पासधारकांची वेगळी रांग आहे ,मंदिराच्या पायऱ्यावर लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत नागमोडी आकाराच्या बॅरिकेट मधून भाविक रांगेत थांबून वैद्यनाथाचे दर्शन घेत आहेत. सकाळी दहापर्यंत तीन लाख भाविकांनी वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती. ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.
पहा व्हिडिओ :