बीडमध्ये पाठलाग करून दुचाकीचोर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:04 AM2018-07-11T01:04:27+5:302018-07-11T01:06:03+5:30
बीड :चौसाळा येथील बसस्थानकातून दुचाकी चोरून पळ काढणाऱ्यास दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी ९ वाजता मांजरसुंंबा रोडवर केली.
अशोक दिलीप रगडे (३३ रा.स्नेहनगर, बीड) असे पकडलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि गजानन जाधव, गणेश दुधाळ, उबाळे, राठोड, नागरगोजे, बांगर, जोगदंड, साबळे हे नेकनूर परिसरात गुन्हेगारांचा शोध घेत होते. याचवेळी त्यांना चौसाळा बसस्थानकातून एक संशयित व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसला. त्यांनी हटकले असता त्याने पळ काढला. त्यानंतर पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली. त्याने आपला गुन्हा कबूल केला असून नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन त्याला केले असल्याचे जाधव म्हणाले.
कत्तलीसाठी जात होत्या गायी
कत्तलसाठी जाणाºया सात गायींची सुटका करण्यात आली. तसेच एक टेम्पो (एमएच ४३ बी ९१६३) जप्त करून शेख शकील शेख मोहंम्मद व शेख शाहीद शेख पाशा (रा.नेकनूर) या चालक व क्लिनरला ताब्यात घेतले. त्यांना नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या गायी या नेकनूरजवळील एका गोशाळेत असल्याचे पोनि गोंदकर यांनी सांगितले. ८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.