गुटगुटीतपणा गोंडस नव्हे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:52+5:302021-09-04T04:39:52+5:30

मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी मुलांना घरच्या घरी शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे. पालकांनी स्वतःच्या आहारातून मुलांसमोर आदर्श घालून ...

Chatter is not cute ... | गुटगुटीतपणा गोंडस नव्हे...

गुटगुटीतपणा गोंडस नव्हे...

Next

मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी मुलांना घरच्या घरी शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे. पालकांनी स्वतःच्या आहारातून मुलांसमोर आदर्श घालून द्यावा. निरोगी जीवनशैलीचे महत्त्व लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवावे. पौष्टिक खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत मुलांना सामावून घ्यावे. मुलांच्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे अशा पदार्थांचा समावेश असावा.

-डॉ.प्रसाद कुलकर्णी. बालरोगतज्ज्ञ.

...

मुलांना जंक फूड, फास्ट फूडचीच चटक लागलेली असते. त्यांना सकस आहाराचे महत्त्व कितीही समजावून सांगितले तरी ऐकून घ्यायला तयार नसतात. हिरव्या भाज्या, कडधान्ये, फळे यांच्या जाहिराती कधीही टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत; मात्र तेच पौष्टिक अन्न असते. याकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. पौष्टिक पदार्थ बनवण्यात मुलांना सहभागी करून घेतल्यास त्यांच्यात सकस आहाराविषयी गोडी निर्माण होऊ शकते.

-डॉ. स्वाती शिंदे, आहार तज्ज्ञ, अंबाजोगाई.

...

पालकांचीही चिंता वाढली

टीव्हीवरील जाहिरातीत दररोज नवनवीन खाद्यपदार्थाच्या निर्मितीची जाहिरात दाखविली जाते. परिणामी याचा परिणाम थेट लहान मुलांवर होतो. ते लगेच त्या प्रॉडक्टची मागणी करतात. त्यामुळे मुलांना फास्टफूडची सवय मोठ्या प्रमाणात लागली आहे.

-अनिता अंबुरे.

...

पॅकबंद पदार्थ, जंकफुड लहान मुलांसाठी घातक ठरू लागले आहेत. याचे मोठे दुष्परिणामही पालकांसमोर आहेत. तरीही मुलांच्या हट्टापाई असे पदार्थ मुलांना दिले जातात. असे पदार्थ खाणे ही आता मुलांची सवयच झाली आहे.

-रेणुका राखे.

Web Title: Chatter is not cute ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.