ऑक्सिजन लेव्हल तपासा, हलगर्जी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:11+5:302021-05-01T04:32:11+5:30

बीड : सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जात आहेत. परंतु असे असले तरी या ...

Check oxygen level, do not neglect | ऑक्सिजन लेव्हल तपासा, हलगर्जी करू नका

ऑक्सिजन लेव्हल तपासा, हलगर्जी करू नका

googlenewsNext

बीड : सौम्य लक्षणे असणाऱ्यांना सध्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवून उपचार केले जात आहेत. परंतु असे असले तरी या रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल प्रत्येक दोन तासाला तपासा. उपचारात कसलीही हलगर्जी करू नका. गंभीर रुग्णांना तळमजल्यातच उपचार करा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिल्या. बुधवारी सकाळी त्यांनी बार्शी रोडवरील वायसीएम सीसीचा आढावा घेतला.

सध्या कोराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत अथवा सौम्य आहेत तसेच ऑक्सिजनची गरज नाही अशांना रुग्णालयात न ठेवता कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. येथेही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर, कर्मचारी आहेत. बुधवारी सकाळीच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी बार्शी रोडवरील सीसीला भेट दिली. येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. रुग्णांची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. नियमित योगा, चाचणी, तपासणी आदी कामांत हलगर्जी करू नका, असेही डॉ. पवार यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. डॉ. कासट यांनीही रुग्णांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. सीसीसीमधील स्वच्छतेवर विशेष भर देण्यास सांगितले.

===Photopath===

290421\012729_2_bed_14_29042021_14.jpeg

===Caption===

बीड शहरातील बार्शी रोडवरील सीसीसीचा आढावा धेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट.

Web Title: Check oxygen level, do not neglect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.