छत्रपती कारखान्याच्या ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:36+5:302021-04-09T04:35:36+5:30

: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ...

Chhatrapati factory sugarcane bill installment in bank class | छत्रपती कारखान्याच्या ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग

छत्रपती कारखान्याच्या ऊस बिलाचा हप्ता बँकेत वर्ग

Next

: छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ऊस गाळपास दिलेल्या शेतकऱ्याचे ऊस बिलाचा पहिला हप्ता बँक ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात १० कोटी ७० लाख रुपये वर्ग करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन जगताप यांनी केले आहे.

माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२०-२१ मध्ये आज अखेर एकूण गाळप ३ लाख ३५ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. तसेच कारखान्याने २५ ऑक्टोंबर २० ते ३१ जानेवारी २१ पर्यंतच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता १ हजार ९०० रुपये प्रति मे. टना प्रमाणे या अगोदर शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत.

माजलगाव तालुक्यातील तसेच कार्यक्षेत्रातील इतर कारखान्यापेक्षा गाळप क्षमता व विविध पदार्थाचे कोणतेही प्रकल्प नसताना माजी आमदार तथा चेअरमन बाजीराव सोनाजीराव जगताप यांनी शेतकऱ्यांचे हित जपत ऊस बिलाचा पहिला हप्ता काढला आहे.

तसेच कारखान्याचे १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान ५६ हजार ३३५ मे. टन उसाचे गाळप झालेले आहे. यामध्ये एकूण ७९५ शेतकऱ्यांचा ऊस बिलाचा पहिला हप्ता १९०० रुपये प्रति मे.टना प्रमाणे एकूण १० कोटी ७० लाख ३८ हजार १९६ रुपये बँकेत वर्ग केले आहेत. उर्वरित राहिलेल्या ऊस बिलाच्या रक्कमेचे टप्या- टप्प्याने लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे व्हा.चेअरमन मोहन जगताप यांनी सांगितले.

Web Title: Chhatrapati factory sugarcane bill installment in bank class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.