छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:31 AM2018-06-27T00:31:06+5:302018-06-27T00:31:38+5:30
बीड नगर पालिकेच्या वतीने मंगळवारी शहरातील मल्टीपर्पज मैदानावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
बीड : बीड नगर पालिकेच्या वतीने मंगळवारी शहरातील मल्टीपर्पज मैदानावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. जयदत्त क्षीरसागर, अॅड. जगन्नाथ औटे हे होते. या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, प्रदिप साळुंके, सी.ओ.डॉ. धनंजय जावळीकर, कॉ.नामदेव चव्हाण, बबन वडमारे, डॉ.योगेश क्षीरसागर, भास्कर जाधव, सादेक अली, रवींद्र कदम, अजय जाहेर पाटील, इंजि.विष्णू देवकते, गणेश वाघमारे, राहुल वायकर, कमल निंबाळकर, विनोद इंगोले, नगरसेवक विकास जोगदंड, मुखीद लाला, विनोद मुळूक, विष्णू वाघमारे, जयश्री विधाते, भीमराव वाघचौरे, शेख मतीन, राजेंद्र काळे आदींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ.जयदत्त क्षीरसागर म्हणाले, महापुरूषांचे पुतळे उभारणं प्रतिकात्मक असले तरी येणाऱ्या नवीन पिढीला महापुरूषांचे विचार देणे तितकेच महत्वाचे आहे. या उद्देशानेच आपण आज राजर्षी शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने उभारत आहे. समतेचा व पुरोगामी विचार शाहू महाराजांनी महाराष्ट्राला दिला आहे.
अज्ञानामुळेच धर्मांध शक्तींचा उदय होतो- प्रदीप सोळुंके समाजातील आज्ञानामुळेच धर्मांध शक्ती उदयाला येतात. जो पर्यंत फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आपण आत्मसात करणार नाहीत तो पर्यंत आपल्याला गती मिळणार नाही. समाजातले अज्ञान दूर करायचे असेल तर प्रत्येकाने शाहू महाराजांचे चरित्र अभ्यासले पाहिजे, असे प्रतिपादन प्रदीप साळुंके यांनी केले.
यावेळी प्रा.जगदीश काळे, विलास बडगे, दिनकर कदम, सखाराम मस्के, वैजीनाथ तांदळे, सुभाष सपकाळ, अॅड.बप्पा औटी, विलास विधाते, सुधाकर मिसाळ, अतुल संघानी, नवी दुज्जमा, अरूण बोंगाणे, अतुल काळे, नागरे तांबारे, विशाल तांदळे, विठ्ठल गुजर, विशाल मोरे, विकास भिसे, नाना मस्के, डॉ.रमेश शिंदे, शरद चव्हाण, सचिन बुंदेले, कपिल सोनवणे, दीपक थोरात, सुमीत धांडे, रवि शिंदे, कामराज शेख, माजेद कुरेशी, नाजू बागवान, आशिष काळे, प्राचार्य तेलप यांची उपस्थिती होती. यावेळी आभार प्रदर्शन अॅड.महेश धांडे यांनी केले. कार्यक्रमात के.एस.के.च्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या पोवाड्यामुळे रंगत भरली होती.
आम्ही दिलेला शब्द पाळला- भारतभूषण क्षीरसागर
मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती की, बीडमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारावा. आज बीड नगर पालिकेने तो शब्द पाळला व शहराच्या मध्यवर्ती भागात जयंती निमित्ताने शाहू महाराजांचा पुतळा उभारला असल्याचे त्यांनी सांगितले.