आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 02:43 PM2021-02-02T14:43:24+5:302021-02-02T14:43:44+5:30

Bird Fluआष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे.

Chicken death season will not stop in Ashti taluka; 15 hens were slaughtered at Patan-Sangvi | आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या 

आष्टी तालुक्यात कोंबड्यांचे मृत्यू सत्र थांबेना; पाटण-सांगवी येथे 15 कोंबड्यां दगावल्या 

googlenewsNext

कडा ( बीड ) : कुक्कुटपालन शेडमधील 15 कोंबड्यां अज्ञात रोगाने दगावल्या असल्याची घटना सोमवारी रात्री आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथे घडली. आष्टी तालुक्यातील कोंबड्या मरण्याचे मृत्यू सत्र सुरूच असून याचे निदान होत नसल्याने शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिकांत धास्ती वाढत चालली आहे. 

आष्टी तालुक्यातील पाटण सांगवी येथील आजिनाथ जगताप यांचे गावाच्या बाहेर अडीज हजार कोंबड्याचे शेड आहे. यातील  15 कोंबड्या सोमवारी रात्री अचानक अज्ञात रोगाने दगावल्याची घटना घडली आहे. आजवर तालुक्यात  शिरापुर,पिंपरखेड, धानोरा, केरूळ, सराटेवडगांव, खिळद, येथे पक्षी व कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. बर्ड फ्ल्यूची धास्ती असली तरी आजवर पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेले अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मग आज अचानक मेलेल्या कोंबड्याचा मृत्यू नेमकं कशाने झाला हे अहवाल आल्यावरच समजेल. मंगळवारी सकाळी पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ.  अरूण तुराळे यांनी पंचनामा करून मृत कोंबड्याची विल्हेवाट लावली.

तालुक्यातील कोंबड्याचे मृत्यू सत्र थांबेना 
आष्टी तालुक्यातील शिरापुर, सराटेवडगांव, केरूळ, खिळद, धानोरा, पिंपरखेड येथे पक्षी व कोंबड्याचा मुत्यु झाला. त्याचा अहवाल देखील निगेटिव्ह आला. मग बर्ड प्युची लागण नसली तरी नेमक मरण्याचं कारण काय अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  याबाबत आष्टी येथील तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आजवर मरण पावलेले पक्षी किंवा कोंबड्या या बर्ड फ्ल्यूने  मेल्या नाहीत. पाटण येथील प्रकरणात अहवाल येताच निदान समोर येईल.

Web Title: Chicken death season will not stop in Ashti taluka; 15 hens were slaughtered at Patan-Sangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.