मित्रांसोबत पोहताना पाण्याचा अंदाज चुकला; १७ वर्षीय मुलगा गोदावरी पात्रात बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 05:24 PM2021-10-19T17:24:43+5:302021-10-19T17:26:54+5:30
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील काही मुले रोजच्या प्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते.
गेवराई : पाण्याचा अंदाज न आल्याने गोदावरी नदीतील डोहात बुडून एका १७ वर्षीय मुलाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. तान्हाजी लिंबाजी आरबड असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना तालुक्यातील सुरळेगाव येथे मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास गावातील काही मुले रोजच्या प्रमाणे नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी तान्हाजी लिंबाजी आरबड याला नदीच्या एका डोहातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हे सोबतच्या मुलांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केला. दरम्यान गावातील शरद भंडारे या तरुणाने डोहात उडी मारुन तान्हाजीला बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मागील चार महिन्यात ८ जणांचा गोदावरी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. सातत्याने घडणाऱ्या घटना चिंतेचा विषय बनला आहे.