लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडींमध्ये दुप्पट वाढ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:09+5:302021-08-21T04:38:09+5:30

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ अविनाश मुडेगावकर अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे ...

Children's health deteriorated; Double increase in OPDs ...! | लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडींमध्ये दुप्पट वाढ...!

लहान मुलांची तब्येत बिघडली; ओपीडींमध्ये दुप्पट वाढ...!

googlenewsNext

डेंग्यू, टायफाईडचे अनेक रुग्ण, थंडी-तापाचीही साथ

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : वातावरणातील बदलामुळे अनेक लहान मुलांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे पालक चिंतेत आहेत. कोरोनाच्या भीतीखाली असलेल्या पालकांना आता मुलांच्या आजाराची काळजी लागली आहे.

सध्या शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मुलांना उपचारासाठी आणले जात आहे. त्यामध्ये साधारणत: सर्दी, ताप, खोकला ही लक्षणे आहेत. रुग्णालयात तापाची औषधे देऊन उपचार केले जात आहेत. त्यानंतरही आजार कमी न झाल्यास मात्र डेंग्यू तसेच टायफाॅईडची चाचणी केली जात आहे. काही मुलांना डेंग्यूची लक्षणे आढळल्यानेही चिंता वाढली आहे. मुलांना डासांपासून सुरक्षित ठेवण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे.

एका बेडवर दोन रुग्ण ठेवण्याची वेळ

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात थंडीताप व व विविध आजारँचे रुग्ण वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन रुग्ण ठेवण्याची वेळ बालकक्षात आली होती. मात्र आता ही स्थिती कमी झाली आहे.

डेंग्यू-मलेरियाची चाचणी

ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे असलेल्या मुलांना उपचार दिल्यानंतरही आजार कमी न झाल्यास डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली जात आहे. शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत जवळपास ४० रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच खासगी रुग्णालयातही रुग्ण असल्याचे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात ही संख्या मोठी आहे.

बालरोगतज्ज्ञ म्हणतात....

सध्या पावसाच्या दिवसात मुलांना आजार होण्याचे प्रमाण जास्त असते. यात वातावरणातील बदल हे एक कारण आहेच; पण त्याच वेळी दूषित पाण्यामुळे मुले आजारी पडू शकतात. घर व परिसरातील स्वच्छता या काळात अत्यंत गरजेची आहे.

- डॉ. रमेश लोमटे, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई.

लहान मुले पावसात खेळतात, भिजतात. यातून सर्दी, ताप असे आजार होतात. डासांपासून मलेरिया, डेंग्यू या आजारांची भीती आहे. त्यामुळे या काळात सांभाळणे गरजेचे आहे. सकस आहार ही मुलांच्या आरोग्यात महत्त्वाची बाब आहे.

- डॉ.प्रसाद कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ, अंबाजोगाई

अनेक मुलांची होतेय कोरोना चाचणी

कोरोना संशयित मुलांची चाचणी करण्याचा सल्लाही डॉक्टर देत आहेत. ग्रामीण भागात पहिल्या लाटेतही अनेक लहान मुले बाधित झाली होती. मात्र आता हे तापाचे आजार वाढल्याने काळजीपोटी स्वतः पुढाकार घेत पालकही आपल्या बालकांची कोरोना चाचणी करून घेऊ लागले आहेत.

ही घ्या काळजी

१. मुलांना डास चावणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.

२. स्वच्छ पाण्यातील डास धोकादायक असतात. यातून डेंग्यू होऊ शकतो.

३. घरासह परिसर स्वच्छताही या काळात अत्यंत महत्त्वाची आहे.

Web Title: Children's health deteriorated; Double increase in OPDs ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.