चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2023 07:49 PM2023-05-02T19:49:12+5:302023-05-02T19:52:25+5:30

आरणवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जल्लोष; गावकऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद

Children's layzim and traditional dance attracted attention; Aranwadi's Bhim Jayanti 35 years of tradition | चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

चिमुकल्यांच्या लेझीम अन् पारंपारिक नृत्याने लक्ष वेधले; आरणवाडीच्या भीमजयंतीला ३५ वर्षांची परंपरा 

googlenewsNext

- अनिल महाजन
धारूर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त धारूर तालुक्यातील आरणवाडी गावात रविवारी (दि.३०) सायंकाळी उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकींमध्ये दांडिया, पारंपारिक नृत्य, लेझीम पथकाच्या सादरीकरणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या महोत्सवात गावकऱ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.

आरणवाडी गावात मागील ३५ वर्षांपासून ३० एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येते. रविवारी सकाळी आठ वाजताच सरपंच भागवत शिनगारे, उपसरपंच मिथून मस्के, पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश काेकाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुनील शिनगारे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणूकीमध्ये शिक्षक ए.आर. वाघमारे, सांस्कृतिक प्रमुख आकाश मस्के यांनी तयार केलेला सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरिकरण झाले. 

चिमुकल्यांनी भीमगितांवर दांडीया, लेझीम व नृत्यांचे सादरिकरण केले. यात आयुषी मस्के, पंकजा मस्के, स्वरा मस्के, श्रृती मोरे, अनन्या तांगडे, प्रतिक्षा मस्के, प्राजक्ता मस्के, योगिनी मस्के, मोहिनी मस्के, तेजस्विनी मस्के,तृप्ती मस्के,आकांक्षा मस्के, प्रिती मस्के, कामिनी मस्के, विरा मस्के, आदित्य मस्के, अनिकेत मस्के, आदेश मस्के, विराज मस्के, राजरतन मस्के, सुप्रिम मस्के, अजय मस्के या विद्यार्थ्यांनी दांडिया, लेझीम आणि नृत्याचे सादरिकरण केले. हा सोहळ्या गावकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच ठरला. या जयंतीसाठी शिक्षक अंकुश मस्के, आकाश मस्के, उपसरपंच मिथून मस्के, गणेश मस्के, दयानंद मस्के, विशाल डोंगरे, दीपक मस्के यांनी परिश्रम घेतले.

भीमगितांचा रंगला कार्यक्रम
३० एप्रिलच्या पूर्वसंध्येला आरणवाडीतील सामाजिक सभागृहात भीमगीतांचा कार्यक्रम जोरदार रंगला. यात गायकांनी एकाहून एक अशी सरस गितांचे सादरीकरण करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. 

Web Title: Children's layzim and traditional dance attracted attention; Aranwadi's Bhim Jayanti 35 years of tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.